Ad will apear here
Next
युवकांनो, ‘सीएम’ना प्रश्न विचारा
संग्रहित छायाचित्रमुंबई : राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची निर्मिती असलेल्या ‘मी मुख्यमंत्री बोलतोय...’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस युवकांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. या वेळी ‘शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण क्षेत्रातील सुधारणा’ या विषयावरील प्रश्नांना मुख्यमंत्री उत्तरे देणार आहेत. 

या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारता येणार आहेत. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या निवडक प्रश्नांना मुख्यमंत्री उत्तरे देतील. यासाठी विचारण्यात येणारे प्रश्न विषयाशी निगडित धोरणात्मक बाबींवर असावेत, वैयक्तिक नसावेत, असे माहिती व जनसंपर्क संचालनालयाने कळवले आहे. आपले प्रश्न मोबाइलवरील संदेश स्वरूपात किंवा ऑडिओ रेकॉर्ड करून स्वत:च्या छायाचित्रासह पाठवावेत, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रश्न विचारण्यासाठी मुदत : पाच मे २०१७ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत 

ई-मेल : mmb.dgipr@gmail.com 
व्हॉट्सअॅप : ८२९१५ २८९५२
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZUZBC
Similar Posts
मुख्यमंत्री देणार तुमच्या प्रश्नांची उत्तरे मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेशी संवाद साधणार असून, नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. हा कार्यक्रम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयार्फे आयोजित करण्यात आला असून, ‘मी मुख्यमंत्री बोलतोय...’ असे कार्यक्रमाचे नाव आहे. ‘महान्यूज’ने त्या संदर्भातील वृत्त दिले असून, कार्यक्रमाची
‘सर्वच लोकसेवकांना संरक्षण मिळणार’ मुंबई : ‘भारतीय दंड संहिता आणि फौजदारी प्रक्रिया संहिता (महाराष्ट्र सुधारणा) विधेयकामुळे केवळ सरकारी कर्मचारीच नव्हे, तर सर्वच लोकसेवकांना संरक्षण मिळणार आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. लोकसेवकांच्या संरक्षणासंदर्भातील विधेयक शनिवारी (एक एप्रिल) विधानसभेत संमत करण्यात आले. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते
साकारले पहिले ‘पुस्तकांचे गाव’ मुंबई : भारतातील पहिल्या पुस्तकांच्या गावाचे उद्घाटन येत्या चार मे रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे. सातारा जिल्ह्यातील स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असलेले भिलार हे गाव ‘पुस्तकांचे गाव’ या अभिनव स्वरूपात पुढे येत आहे. पाचगणी ते महाबळेश्वर रस्त्यावर पाचगणीपासून सुमारे ५ किलोमीटर
पर्यटकांसाठी रायगडावरील ‘ई-बुक’ रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती एकत्रितरीत्या उपलब्ध व्हावी, यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘रायगड : पर्यटन विविधा’, या ‘ई-बुक’चे नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. रायगड जिल्ह्यात येणाऱ्या सर्व पर्यटकांना माहिती देणाऱ्या ‘मोबाईल ॲप’चेही या वेळी उद्घाटन करण्यात आले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language